Breaking News
" द किचन फाईल्स " - आम आदमी पक्ष नवी मुंबई कडून वाढत्या महागाईच्या विरोधात प्रतीकात्मक आंदोलन
पेट्रोलचा नवा भाव ३० रुपये पाव आपचे " द किचन फाईल्स " आंदोलन
नवी मुंबई : शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी शिवाजी चौक वाशी, नवी मुंबई येथे आम आदमी पक्षाच्या वतीने सतत वाढत्या पेट्रोल - डिझेलच्या किंमती आणि त्यामुळे उदभवणारी समस्या, सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणारी महागाई ह्याचा रोष दर्शविण्यासाठी " द किचन फाईल्स " अश्या प्रतीकात्मक नावाने आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनाला कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
ह्या वेळी कार्यकर्त्यानी चुलीवर स्वयंपाक करताना दाखवूंन, वाढत्या महागाईमुळे देश कसा मागासलेपणाकडे वाटचाल करीत आहे हे दाखवून दिले. तसेच छोट्या छोट्या बाटल्यात पेट्रोल विक्री करायचे भासवून, लोन फॉर्म भरण्याचे दाखवून, आज पेट्रोल - डिझेल हे सामान्यजनांच्या किती आवाक्याबाहेर गेलेले आहे हे पण दाखवून दिले.
एकेकाळी , पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्याचे निवडणूक आश्वासन देऊन, केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारने सोयीस्करपणे हे आश्वासन विसरून जनतेला वाटाण्याच्या अक्षता देण्याचे काम केले आहे. आजच्या घडीला, आश्वासने खरोखर पाळणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष आहे . पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणे हे केंद्र सरकारचे काम असून सध्यातरी आपच्या नियंत्रणात नसले तरी आपने दिल्लीतील सामान्य जनतेला वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि महिला ट्रान्सपोर्ट ह्या क्षेत्रात मोफत सुविधा देऊन, सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन खर्चात दिलासा दिला आहे.
श्यामभाऊ कदम - अध्यक्ष - आप नवी मुंबई.
महागाईचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला एक वेळचे जेवणही कठीण होत आहे. सरकारने या वाढत्या किंमतीकडे लक्ष द्यावे. सद्यस्थितीत सामान्य माणसाची अवस्था म्हणजे आमदनी आठनी , खर्चा रुपया अशी झाली आहे. सरदार कुलविंदर सिंह बिंद्रा, ऐरोली वार्ड अध्यक्ष
केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मिळून सतत वाढत्या पेट्रोल-डिझेल किंमतीआणि त्यामुळे होणाऱ्या महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी काही ना काही तरी तोडगा काढावा. अनिल जाधव, घणसोली वॉर्ड अध्यक्ष
रिपोर्टर