Breaking News
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्र आयोजित विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सदर स्पर्धेमध्ये एकूण १४ संघ व २०० च्या वर खेळाडू यांनी सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धा ६ मार्च व ७ मार्च २०२४ रोजी ओव्हल मैदान येथे खेळविण्यात आली.
सदर स्पर्धेच्या ठिकाणी मा. सचिव (१)(का.) जितेंद्र भोळे , मा. सचिव (२) (का.) डॉ. विलास आठवले, मा. सहसचिव शिवदर्शन साठे , मा. उपसचिव (विधी) श्रीमती. सायली कांबळी, मा. अवर सचिव कोमटवार , मा. कार्यवाही संपादक अजय अग्रवाल , मा. कक्ष अधिकारी प्रकाश थिटे या मान्यवरांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून भेट दिली, स्पर्धा घेण्यासाठी पाठिंबा दिला व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
सदर स्पर्धेसाठी मार्मिक नार्वेकर अध्यक्ष कर्मचारी संघटना, मकरंद पाटील मा. अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे विशेष कार्य अधिकारी, ग कक्षाचे अधिकारी काळे, राणे , कल्याण केंद्रातील पदाधिकारी शैलेश शेडगे, भावेश नार्वेकर, सहकारी मित्र चेतन गावकर, योगेश उपळकर, मनोज फुलबांदे, विकास शिंदे, नितीन मोकाशी, दामोदर म्हामुणकर, कमलेश चव्हाण, चंद्रकांत पाटील , नंदन सरमळकर तसेच इतर सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहायक वैभव लकुर यांनी सर्व खेळाडूंसाठी दोन दिवस पिण्याच्या पाण्याची बिसलरी बॉटलची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
अंतिम निकाल,
विजेता संघ , एम.एल.एस. डेसिरे - अ
उप विजेता संघ , पानथर - ९ अ
मालिकावीर शैलेश शेडगे, पानथर - ९ अ
उत्कृष्ट गोलंदाज किरण गायकर , पानथर - ९ अ
उत्कृष्ट फलंदाज तुषार बचाटे , एम.एल.एस. डेसिरे - अ
दोन्ही संघाने अंतिम फेरीत विजय मिळवण्याकरिता अथक परिश्रम घेतले त्याप्रमाणेच मॅच देखील अटीतटीची झाली.
खेळाडूं सह या स्पर्धेला प्रेक्षकांचा देखील भरपूर उत्साह लाभला. स्पर्धेत सहभागी सर्व संघांचे व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व खेळाडूंच्या खेळाडू वृत्तीचे व सर्व खेळाडू यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केलेल्या सहकार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे तसेच स्पर्धेच्या ठिकाणी मैदानावर प्रेक्षक म्हणून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी उपस्थित असणारे विधिमंडळातील सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचे देखील आभार नंदन सरमळकर यांनी व्यक्त केले आहे.
रिपोर्टर