विळे येथील जि.प. मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; अॅड. स्मिता चिपळूणकर यांची कुटुंबासह उपस्थिती
- by Santosh Jadhav
- Jan 26, 2026
विळे येथील जि.प. मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; अॅड. स्मिता चिपळूणकर यांची कुटुंबासह उपस्थिती
विळे (ता. माणगाव, जि. रायगड) : आज २६ जानेवारी रोजी विळे येथील रा. जि. पा. मराठी शाळा, विळे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जर्नालिस्ट असोसिएशनच्या नॅशनल प्रेसिडेंट अॅड. स्मिता चिपळूणकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शाळा परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला. अॅड. स्मिता चिपळूणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, संस्कार आणि संविधानाच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. आपल्या गावातील आणि शाळेतील कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
या वेळी शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने “माझं गाव, माझी शाळा, माझा अभिमान” ही भावना प्रत्येकाच्या मनात ठसली. गावातील शाळेत साजरा झालेला हा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरला.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
Sushant Singh Rajput
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav