Breaking News
तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत
गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत
इरफान शेख
तुर्भे : तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने सात-आठ वर्षापूर्वी बांधलेले सहा छोटे गाळे आहेत. त्या गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत झाले आहेत. तरीदेखील सिडको त्या गाळ्यांची
विक्री अथवा भाडेपट्ट्याने देत नाही.
अशाप्रकारे सिडकोचे अधिकारी सिडकोचे आर्थिक नुकसान करत आहेत. सिडकोचे आर्थिक नुकसान टाळून उत्पन्न वाढीसाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तुर्भे रेल्वे स्टेशन येथील बांधलेले गाळे तात्काळ विक्री अथवा भाडेपट्ट्याने द्यावे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा जवळच उपलब्ध होतील , काही लोकांना रोजगार उपलब्ध होईल व सिडकोच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
रिपोर्टर