Breaking News
आश्विनी विजय माने यांची बेलापुर विधानसभा शहर युवती अधिकारीपदी नियुक्ति
नवी मुंबई : शिवसेनेने नवी मुंबई शहरात संघटना बांधणीला प्राधान्य देण्यास सुरूवात केली असून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यावरही भर दिला जात आहे. येवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बेलापुर विधानसभा शहर युवती अधिकारीपदी आश्विनी विजय माने यांची निवड करण्यात आली आहे.
आश्विनी विजय माने या शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षितही आहेत. त्यांच्या घरातच त्यांना बालपणापासून शिवसेनेचे बाळकडू मिळाले असून वडील विजय माने यांच्या कार्यात गेल्या काही वर्षापासून त्यांचेही सक्रिय योगदान असायचे. युवा वर्गातील त्यांचे कार्य, बालवयापासून शिवसेनाप्रेम, काम करण्याची सचोटी या सर्व निकषावर बेलापुर विधानसभा शहर युवती अधिकारीपदी आश्विनी विजय माने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे बेलापुर विधानसभेतील युवा वर्गातून स्वागतच करण्यात येत आहे.
रिपोर्टर