Breaking News
बेलदार समाजातील महिला अधिकार्याची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ; स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
अमरावती : अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत आर. एफ. ओ. ( परिक्षेत्र अधिकारी ) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या आर. एफ. ओ. दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून आर. एफ. ओ. ( वनपरिक्षेत्र अधिकारी ) या पदावर कार्यरत होत्या. आज सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी उघड होताच परिसरात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर