Breaking News
दिघा प्रभाग २ , गणेश नगर येथे आप नवी मुंबईच्या १० व्या कार्यालयाचे उदघाटनासह भव्य पक्ष प्रवेश सोहळा
आपचा झाडू इतर पक्षासाठी ठरणार डोक्याला ताप
नवी मुंबई : प्रचलित भ्रष्ट राजकारणातील सत्तेमधून पैसा कमावणे, आणि त्याच पैश्याचा गैरवापर करून पुन्हा पुन्हा सत्तेत येणे ह्या दुष्टचक्राला भेदण्यासाठी आणि दिल्ली येथील उत्कृष्ट कामाच्या पार्श्वभूमीवर, कट्टर इमानदार आम आदमी पार्टीच्या मंचाखाली जागरूक सामान्यजनांची फौज देशभर झपाट्याने तयार होत आहे, आणि ह्याला नवी मुंबई देखील अपवाद नाही.
दिनांक बुधवार ८ जून रोजी, लवकरच होऊन गेलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नवी मुंबईतील दिघा प्रभागा मधील, लोकप्रिय नेते संतोष केदारे ह्यांनी मोठ्या संख्येने त्याच्या कार्यकर्त्याच्या उपस्थित , दिघा प्रभाग २, विठ्ठल रुख्मिणी मंदिर - गणेश नगर येथे, भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याच्या साक्षीने आणि आप-महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे आणि नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम ह्यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. ह्या प्रसंगी प्रभाग २ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन देखील राज्य सचिवांमार्फत करण्यात आले. ह्या प्रसंगी संतोष केदारे ह्यांच्या सोबत, जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांनी पक्ष प्रवेश घेतला , त्यात महिलांचा सुध्दा मोठा सहभाग होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्य संकल्पनेवर आणि बाबासाहेबानी संविधानाच्या रूपात लिहून ठेवलेला, त्यांच्या स्वप्नातील भारत, प्रत्यक्षात आणण्यास आम आदमी पार्टी कटिबध्ध आहे. आम आदमी पक्ष - महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे
प्रचलित राजकारणातील भ्रष्ट नेते, पाच वर्षासाठी फक्त पाचशे रुपयाची भीक देऊन, खराब शाळांमार्फत तुमच्या चिमुकल्याचे, खराब आरोग्य व्यवस्थेमार्फत तुमच्या कुटुंबातील वयोवृद्धांचे भवितव्य विकत घेतात. त्यामुळे उत्कृष्ट भवितव्यासाठी जागरूक होऊन, फक्त झाडूचीच तीन बटणे दाबून, नवी मुंबईत आप पक्षाला घसघशीत विजयश्री मिळवून ह्या हि नम्र विनंती. श्यामभाऊ कदम आम आदमी पक्ष - अध्यक्ष , नवी मुंबई.
दिघा वासियांनी, त्याचे लोकप्रिय नेते संतोष केदारे ह्याच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहून, आप तर्फे, आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी, त्यांचे हात बळकट करावे. प्रीती शिंदेकर - उपाध्यक्ष आप नवी मुंबई
आत्तापर्यत कित्तेक वर्षापासून, मी एक स्थानिक जनप्रतिनिधी म्हणून, मी दिघा विभागातील जन सामान्यांच्या मूलभूत नागरी समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आलो आहे. आता आम आदमी पक्षा सारख्या प्रामाणिक नियतेने काम करीत असलेल्या पक्षातर्फे मला जनप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची संधी, जर स्थानिकांनी दिली, तर आप - दिल्ली सारखेच उत्कृष्ट काम दिघ्या मध्ये सुध्दा करून दाखवू शकेल. संतोष केदारे, दिघा प्रभाग २ अध्यक्ष
ह्या कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी, स्थानिक कार्यकर्ते - संतोष गोडबोले, दिनेश ठाकूर , तसेच दिघा नोड अध्यक्ष सुनील पाटोळे, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, निवृत्त कामगार आयुक्त आणि आप नवी मुंबई मुख्य कामगार संघटना समन्वयक : देवराम सूर्यवंशी, ऐरोली नोड अध्यक्ष - नामदेव साबळे आणि इतर बहुसंख्य स्थानिक कार्यकर्त्याचा मोलाचा सहभाग होता.
रिपोर्टर