लॅपटॉप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष - २ कडुन अटक एकुण ०७ गुन्ह्यांची उकल
- by Santosh Jadhav
- Sep 06, 2021
लॅपटॉप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष - २ कडुन अटक एकुण ०७ गुन्ह्यांची उकल
नवी मुंबई , मुंबई शहर , ठाणे व नवी दिल्ली या शहरामधील कोमा , विजय सेल्स , रिलायन्स डिजीटल , किंग्ज अशा इलेक्टॉनिक शोरूममधुन डिसप्लेसाठी ठेववेल्या लॅपटॉपची चोरी करणाऱ्या राजस्थान येथील दोन गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष २ पनवेल यांनी अटक करून त्यांच्याकडुन एकुण १२,१०,३३७/- रू किंमतीचे ०८ लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली अॅल्टो कार हस्तगत केली. नमुद आरोपीकडुन एकुण ०७ लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. अटक आरोपींची नावे १) धर्मसिंह चौथीलाल मिना, वय-३८ वर्षे, रा.लि. पिलोदा, ता. गंगापुर, सवाई माधोपुर, राज्य-राजस्थान, २) आशिषकुमार रामहरी मिना, वय-२६ वर्षे, रा.ठि. रोशी, ता.नादौती, जि. करोली, राज्य-राजस्थान
नवी मुंबई , मुंबई शहर व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये असलेल्या क्रोमा , रिलायन्स डिजीटल , विजय सेल्स , किंग्ज अशा इलेक्टॉनिक शोरूम मधुन डेमो साठी ठेवलेल्या लॅपटॉपची चोरी होण्याचे प्रकार घडलेले होते. अशाचप्रकारे एकाच दिवशी १७ ऑगस्ट २०२१ रोजी नवी मुंबई आयुक्तालयातुन काही तासाच्या अंतरामध्ये पनवेल शहरातील विजय सेल्स व सीबीडी बेलापुर येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स या शोरूममधुन डेमोसाठी ठेवलेले ०३ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे व सीबीडी बेलापुर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद झाले होते. तसेच दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी या एकाच दिवशी बोरीवली पोलीस ठाणे मुंबईच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या अशा ०३ इलेक्टॉनिक शोरुमधुन ०३ लॅपटॉप व चितळसर मानपाडा पोलीस ठाणे , ठाणे शहर हद्दीतुन ०१ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत असे एकुण ०४ गुन्हे नोंद झाले होते. नमुद गुन्ह्यातील दोन आरोपी हे मिळुन आले. नमुद आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असुन, नमुद आरोपी शहर पोलीस ठाणे गुर.नं. ४५३/२०२१ भादवि कलम ३८०, ३४ मध्ये दि. ०१/०९/२०२१ रोजी २२:० अटक करण्यात आली आहे. त्यांची दि.८/०९/२०२१ रोजी पर्यत पोलीस कोठडी मंजुर झाली आहे.
अटक आरोपींकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे :
नमुद आरोपींकडे सखोल तपासकरीता त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली मारूती सुझुकी अल्टो में RJ-45-CP-9308 ही हस्तगत करण्यात आली असुन, एकुण ०८ लॅपटॉप एकुण १२,१०,३२७/- रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, नमुद आरोपींकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत
अटक आरोपीकडुन उघडकीस आणलेले गुन्हे :
अ. पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक क. १ ૨ ३ पनवेल शहर पोलीस स्टेशन, नवी मुंबई सीबीडी पोलीस स्टेशन, नवी मुंबई बोरीवली पोलीस स्टेशन, मुंबई शहर बोरीवली पोलीस स्टेशन, मुंबई शहर बोरीवली पोलीस स्टेशन, मुंबई शहर गुर नं. क्र ४५३/२०२१, भादवि कलम ३८०, ३ गुर नं. १६०/२०२१, भादवि कलम ३८०, ३४ गुर नं. ९६५/२०२१, भादवि कलम ३८०, ३४ गुर नं. ९६६/२०२१, भादवि कलम ३८०, ३४ गुर नं. ९६७/२०२१, भादवि कलम ३८०,३६ गुर नं. १८१/२०२१, भादवि कलम ३८०,३४ ४ ५ ६ चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर ७ निर्मान विहार पोलीस स्टेशन, दिल्ली गुर नं. १११२/२०२१, भादवि कलम ३८०, ३
उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी :
सदरच्या गुन्हयांच्या तपासादरम्यान वपोनि गिरीधर गोरे, सपोनि संदीप गायकवाड, पोउपनि मानसिंग पाटील , पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे, सफौ सुनिल सांळुके, सफौ. सुदाम पाटील, पोहवा १३३९/प्रशात काट २७००/ सुनिल कुदळे, पोहवा ४२०/सचिन पवार, पोहवा १०३४/ज्ञानेश्वर वाघ, पोहवा ४४/तुकाराम सुर्य १३०६/मनोज जानराव, पोहवा १७३२/अनिल पाटील, पोहवा १९३०/राजु बैकर, पोना ४४१३/आजि पोना २००५/सचिन म्हात्रे, पोना २०८२/इंद्रजित कान
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav