Breaking News
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालया ने गेल्या वर्षी यूपीएससी चा शेवटचा प्रयत्न देणाऱ्यांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी यूपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
गेल्या वर्षी कोरोनामुळे यूपीएससीची परीक्षा देण्यामध्ये अनेकांना अडचणी आल्या होत्या. तसेच कोरोनाच्या नियमांमुळे अनेकांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना आपला शेवटचा प्रयत्न देता आला नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी मिळावी अशी अनेकांनी मागणी केली होती.
रिपोर्टर