आप आदमी पक्षाचा नवी मुबईतला पहिलाच "आप" चा मेळावा यशस्वी
- by Santosh Jadhav
- Dec 20, 2021
"आप"च्या मेळाव्याला नवी मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
आप आदमी पक्षाचा नवी मुबईतला पहिलाच "आप" चा मेळावा यशस्वी
दिल्लीचे ३ वेळेचे आमदार विशेष रवी यांनी दिला नवी मुंबई पालिका निवडणूक जिंकण्याचा मंत्र
अरविंद केजरीवाल यांच्या शाळा- दवाखानांच्या राजकारणाला नवी मुंबईकरांकडून स्वागत
१९ डिसेंबर विष्णुदास भावे सभागृहात आपच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी , एकटे एकटे नवी मुंबईच्या स्टेशन्स वर उभे राहून १० रुपयाची आप टोपी देऊन सदस्य नोंदणी करणारे आप नवी मुंबईचे निष्ठावान कार्यकर्ते , फाऊन्डर मेंबर ह्यांच्या चेहऱ्यावर आनंदायी समाधान दिसून येत होते. चांगली नियत असलेले तर निस्वार्थी संघभावना ठेवणारे उस्फुर्त, निष्ठावान, सुसंस्कृत, प्रामाणिक कार्यकर्ते सुध्दा, पारंपरिक राजकारण्यांच्या तोडीस तोड सोहळा, अत्यंत कमी खर्चात, सामान्यांना कुठलीही आमिषे न दाखविता देखील यशस्वी करू शकतात हा पायंगडाच आप नवी मुंबई टीमने ह्या सोहळ्या मधून दाखून दिलाय . सर्व मान्यवरांचे आगमन झाल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब, सावित्रीबाई फुले ह्यांच्या प्रतिमेबरोबरच नवी मुंबई घडत असताना कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य पणाला लावणाऱ्या लोकप्रिय नेते स्व.दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिल्लीचे सलग ३ वेळा निवडून आलेले आमदार विशेष रवीजी यांनी निवडणूक जिंकण्याचा मोलमंत्र कार्यकर्त्याना सांगताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनताभिमुख कार्याची महिमा संपूर्ण देशात पसंती मिळवत आहे, आम आदमीला आम आदमी पसंत आहे , नेता नाही म्हणून आपली ओळख निर्माण करा असा मोलाचा सल्ला देऊन नवी मुंबई टीम शुभेच्छा दिल्या.
आप सामान्य नागरिकांना ज्या मोफत सुविधा देत आहे, त्या मोफत नसून त्यांनीच भरलेल्या टॅक्सच्या इमानदारपणे वापरून चांगल्या नियतीने जनतेचा फायदा करून देत आहेत - धर्मेश भंडारी - सुरत महानगरपालिका विरोधीपक्ष नेते
वेळेला फार महत्व असते असे अधोरेखित करत महाराष्ट्रचे संयोजक रंगाभाऊ राचुरे यांनी समाज मनावर आपचा परिवार वाढत आहे आणि आज विष्णुदास भावे नाट्यगृहात याची प्रचिती येतेय सांगून प्रत्येक कार्यकर्त्याला एक जुटीने कामांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले
डोक्यावर ठेवलेली, फक्त तीन ग्रामची, फक्त ९० पैशाला मिळणारी आपची गांधी टोपी, म्हणजे आमच्यासाठी अफाट उर्जास्तोत्र असून, इमानदारीची ताकद काय आहे ह्याची जाणीव करून देते - जितेंद्र भावे, राज्य प्रवक्ते आणी कार्यकारी अध्यक्ष, आप - नाशिक.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत नवीन त्रीस्तरीय पॅनल सिस्टिमच्या पार्श्वभूमीवर "तीन बटणे झाडूची - शून्य भ्रष्टाचाराच्या केजरीवाल क्रांतीची " हे घोषवाक्य ठरवून, ईव्हीएम वरील तीन झाडूच्या बटनांच महत्व सांगण्यात आले. छत्रपतींच्या सुराज्याच्या संकल्पनेवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर निष्ठा असणाऱ्या , तडफदार , सुसंस्कृत , सुशिक्षित, धर्मनिरपेक्ष आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेहनतीची कमाई खाणाऱ्या तरुणाची फौज म्हणजे, आम आदमी पार्टी. आणि अश्या पार्टीच्या कामामध्ये , एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो. श्यामभाऊ कदम , कार्यकारी अध्यक्ष , आप - नवी मुंबई.
यासोबत गुजरातचे मोठे नेते , राष्ट्रीय प्रवक्ते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ( एन सी ) चे सदस्य राकेश हिरपारा आणि किशोर भाई देसाई देखील कार्यकत्यांचे मनोबल वाढवले सोबत राज्य सचिव - धनंजय शिंदे , संघटन मंत्री - विजय कुंभार , कोल्हापूर शहर अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रमुख संदीप देसाई, सिनेअभिनेते मुंबई - गुजराथी समितीचे अध्यक्ष संदीप मेहता देखिल प्रमुख उपस्थिती होती.
कोव्हीड नियमांचे पालन करून विष्णुदास भावे सभागृह, वाशी येथे अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला नवी मुंबईतील समाजसेवकांचे कौतुक प्रमाणपत्र देऊन सम्मान करण्यात आले. ह्या सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या सर्व मान्यवरांच्या अभिप्रायानुसार हा सोहळा खूपच छान, शिस्तबद्ध होता. आपच्या सोहळ्या मुळे आप नवी मुंबईचे कार्यकत्यांचा उत्साह द्विगुणित झालाय.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav