Breaking News
मुंबई : मुंबईत लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्ड मध्ये रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. या वॉर्डमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येत 10 ते 15% वाढ होत आहे. चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्ण संख्यावाढीचा दर सर्वाधिक 0.26% इतका आहे.
98% रुग्णसंख्या वाढीच्या केस इमारतींच्या भागातून येत आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रहिवासी इमारतींना नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील विविध भागात कोरोना नियमांची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाण, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीची ठिकाणी आदी ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच इमारतीत बाहेरून येणार्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणे, विवाह कार्यालये, बाजार जागा याठिकाणीही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. इमारतींमध्ये बाहेरुन येणार्या व्यक्तींचे स्क्रीनींग करण्याबाबत तसेच कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एम वेस्ट वॉर्ड मध्ये एकूण 550 इमारतींना नोटीसा देण्यात आल्या. मुंबईत सध्या एकूण 810 इमारती सील आहेत. यांपैकी टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये सर्वाधिक 170 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या सक्रीय कंटेंटमेंट झोनची संख्या 76 आहे.
रिपोर्टर