Breaking News
मी उद्योजक होणारच! यांच्या वतीने भांडुप एक्ससिल्लेन्स पुरस्कार सोहळ्याचे थाटात आयोजन
मुंबई : उद्योजकांना व्यासपीठ निर्माण करून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन व नेटवर्किंगसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारी संस्था मी उद्योजक होणारच ! गेली पंधरा वर्ष यशस्वी काम करीत आहे. याच माध्यमातून मंगळवार ५ सप्टेंबर, २०२३ रोजी भांडुपच्या भगवती सभागृहात भांडुप एक्ससिल्लेन्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कार्नाय्त आले होते. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान चिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास भांडुप चे लोकप्रिय आमदार रमेश कोरगावकर, अनन्या या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे, कवयित्री रेश्मा कारखानीस, वास्तु सल्लागार रविराज अहिरराव वास्तुरविराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झालीत त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून आपली प्रगती साधता येते हे सांगितले. निलेश मोरे व हेमंत मोरे यांनी कित्येक मराठी नोकरदारांना, कलावंतांना उद्योजकता किती महत्वाची आहे या माध्यमातून पटवून दिले. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रमेश कोरगावकर यांनी सांगितले की "मी उद्योजक होणारच ! या संकल्पनेचे एक रोपटे पंधरा वर्षांपूर्वी मोरे बंधू यांनी लावले होते त्याचे रूपांतर आता वटवृक्ष झाले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळते."
रिपोर्टर