सिडकोच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश
- by Santosh Jadhav
- Mar 04, 2022
सिडकोच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश
सिडकोच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा दिलदारपणा !!
उरण : (विठ्ठल ममताबादे )
गुरुवार दिनांक ०३/०३/२०२२ रोजी पुन्हा एकदा सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने कायदेतज्ञ अॅड.डि.के.पाटील आणि त्यांचे सुपुत्र अॅड.कौस्तुभ डी.पाटील हे पितापुत्र शेतकऱ्यांच्या समवेत सिडको कार्यालयात अलिबाग येथील २ रे सह दिवाणी न्यायाधीस व स्तर यांच्या न्यायालयातील बेलीफ सिडकोच्या कार्यालयातील मालमत्तेच्या जप्तीच आदेश घेऊन आले असता सिडकोच्या अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागली असावी म्हणून की काय सिडको भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ सिडकोच्या अंगरक्षकांनी सिडको भवनात शेतकऱ्यांना जाण्यास मज्जाव करत असल्याचे पाहून कायदेतज्ञ अॅड.डि.के.पाटील पिता-पुत्रांनी तसेच न्यायालयाचे बेलीफ यांनी कायदेशीर बडगा उगारून तडक जाॅंईड एम.डी. एस.एस.पाटील यांच्या दालनात शेतकऱ्यांन समवेत जावून जप्तीची कार्यवाही करण्याचे न्यायालयाचे आदेश सदर एस.एस.पाटील यांना देऊन पुढील जप्तीची कार्यवाही करण्यास सुरवात करणारच इतक्यात सदर जाॅंईड एम.डी.एस.एस.पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्या समवेत अॅड.डी.के.पाटील पिता-पुत्रां समोर गयावया करून जप्ती करू नये अशी विनवणी करून १० दिवसाची मुद्दत मागू लागले असता सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी मनाचा दिलदारपणा दाखवून सिडको कडून लेखी हमीपत्र घेऊन १० दिवसाची मुदत देऊन आपला दिलदारपणा सिद्ध केला.
येथील सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडको कडून येणारा मोबदला
१) श्री.काशिनाथ गोपीनाथ भोईर वगैरे१)१,१३,३९,८४८/-
२)श्री.तुकाराम दुकळ्या वगैरे-१,६५,९९,५८७/-
३)श्री. नामदेव सदानंद भोईर १,३३,९६,८६४/-
४)श्री.काशिनाथ गोपीनाथ भोईर वगैरे- ८८,४७,८८१/-
५)श्री.वसंत काशिनाथ पाटील-८५७६६७१/-
६)श्री.बाळाराम नारायण पाटील वगैरे- ५,५९,२९,७७६/-
७) श्री.अमित मोहन घरत- १,८५,९९,२८२/-
८) चंद्राबाई रामकृष्ण घरत- ७४,१३,०५९/-
९)श्री.लिलाधर वामन भोईर-१,०१,४२,८५४/-१
०) लिलाबाई मधुकर पाटील- ७,७०,४३,५३३
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav