हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल वाशीचा करार रद्द करून त्या ठिकाणी, आप दिल्ली सरकारच्या मॉडेलवर आधारित उत्कृष्ट पालिका हॉस्पिटल बनवावे - श्यामभाऊ कदम , कार्यकारी अध्यक्ष - आप - नवी मुंबई
- by Santosh Jadhav
- Mar 14, 2022
हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल वाशीचा करार रद्द करून त्या ठिकाणी, आप दिल्ली सरकारच्या मॉडेलवर आधारित उत्कृष्ट पालिका हॉस्पिटल बनवावे - श्यामभाऊ कदम , कार्यकारी अध्यक्ष - आप - नवी मुंबई
बंद कोव्हीड सेंटर मधील उपकरणांचं ऑडिट करून ती उपकरणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये उपयोगात आणावी.
नवी मुंबई : कोव्हीड प्रभावीत काळात नियमितपणे जागतिक व राष्ट्रीय स्थितीचा आढावा घेत तसेच राज्यातील मुंबईसह इतर शहरांची सद्यस्थिती विचारात घेऊन नवी मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार कोव्हीड सुविधांमध्ये आवश्यकतेप्रमाणे वाढ करणे याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्कतेने पुढाकार घेऊन कार्यवाही केली. हे नक्कीच कौतुकास्पद असून, ह्या सेवेसाठी सर्वच नवी मुंबई नागरिक, महानगरपालिकेचे कायमचे ऋणी राहतीलच.
सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असून दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही एक आकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड उपचारार्थ सुरु करण्यात आलेल्या सुविधांबाबत, नवी मुंबई महानगरपालिकेची सर्वोत्तम कोव्हीड सुविधा म्हणून नावाजले गेलेले सिडको कोव्हीड सेंटर तसेच कार्यान्वित ठेवून उर्वरित कोव्हीड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पण स्वागतार्ह आहे.
पण ह्या बरोबरच, आप नवी मुंबई तर्फे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तांना, सामान्य जनते तर्फे, एक नम्र विनंती करण्यात येते, कि ह्या बंद केलेल्या कोव्हीड सेंटर मधील, जी महागडी उपकरणे, जसे व्हेंटीलेटर्स आणि इतर सर्वच अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या सर्व उपकरणांचं ऑडिट करून ती उपकरणे महानरगरपालिकेच्या आरोग्य केंद्रा मध्ये कशी उपयोगात आणता येतील ह्याचे पण प्लॅनिंग करावे.
आज नवी मुंबईत पालिका आरोग्य सेवांचा दर्जा, सामान्य नागरिकाला चांगल्या सेवेचा आत्मविश्वास देत नसल्यामुळे, खाजगी आरोग्य सेवेचे भरपूर पेव फुटले असून, सामान्य नागरिकांची लूट चालू आहे. जर पालिकेने सुध्दा, आप-दिल्ली सरकारच्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सरकारी आरोग्य सेवेच्या धर्तीवर चांगल्या आरोग्य सेवेचे जाळे नवी मुंबईत निर्माण केले तर, सामान्य माणसाची लूट नक्कीच थांबेल. आणि ह्या सेवांसाठी, बंद झालेल्या कोव्हीड सेंटरची महागडी उपकरणे नक्कीच उपयोगी येतील.
हिरानंदानी फोर्टिस सारखं हॉस्पिटल आज, महानगरपालिकेने दिलेल्या पायाभूत सुविधांवरच उभे आहे, पण ह्या ठिकाणी, सामान्य माणसाला नाममात्र दरात सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नसून, तेथे फक्त नवी मुंबईतील राजकीय पुढारी आणि धनदांडग्यांचीच मक्तेदारी चालते. पालिका, ह्याच पायाभूत सुविधांचा आणि बंद झालेल्या कोव्हीड सेंटरच्या महागड्या उपकरणाची मदत घेऊन, उत्कृष्ट आरोग्य सेवा केंद्र चालू करू शकते, जेथे सामान्यांना नाममात्र दरात आरोग्य सुविधा मिळू शकतील. नाहीतर ह्या अश्या नियोजन अभावी, हि महागडी उपकरणे धूळ खात पडून राहतील आणि निकृष्ट होऊन भंगार बनून राहतील. - आप नवी मुंबई सहसचिव सुनिल जाधव.
वैद्यकीय उपकरणांच्या पुन: वापराचे योग्य नियोजन करावे, आणि हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलचा करार रद्द करून त्या ठिकाणी नवी मुंबईतील नव्हे तर अख्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम १०० टक्के कार्यप्रणालीवर, मनपाच्या सुसज्य आरोग्य सेवा केंद्राची निर्मिती करून, संपूर्ण महाराष्टाला अभिमान वाटेल असे पालिका हॉस्पिटल उभारावे - आप नवी मुंबई उपाध्यक्ष - सुधीर पांडे
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav