एमआयडीसीशी संबंधित विविध विषयांबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांची संयुक्त बैठकीत चर्चा
- by Santosh Jadhav
- Mar 23, 2022
एमआयडीसीशी संबंधित विविध विषयांबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांची संयुक्त बैठकीत चर्चा
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य ठाणे बेलापूर रस्त्यावर भविष्यात वाहतुक नियोजनाच्या दृष्टीने सर्व्हिस रोड तयार करणे तसेच उड्डाणपूल बांधणे याकरिता महानगरपालिकेस एमआयडीसी कडून जागेची आवश्यकता भासणार आहे. याकरिता महानगरपालिकेमार्फत एमआयडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
एमआयडीसीला ठाणे बेलापूर रस्त्यानजिक कोपरखैरणे महापे भागात सर्व्हिस रोड शेजारी छोटे भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. सदर भूखंड वाटप केल्याने रस्त्यांवर गाड्यांची पार्किंग होऊन या भागात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात होती. याबाबत महानगरपालिकेमार्फतही एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आला होता.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एमआयडीसीच्या स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्याची बैठक आयोजित करून याविषयी सविस्तर चर्चा करून महानगरपालिकेची भूमिका विषद करीत वरिष्ठ पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याची सूचना केली. याप्रसंगी एमआयडीसीचे नवी मुंबईतील क्षेत्रीय अधिकारी सतीश बागल , महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व मालमत्ता विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सद्यस्थितीत एमआयडीसी कडून महानगरपालिका क्षेत्रासाठी पुरविल्या जात असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये ५ ते ७ द.ल.लि. पाणी कमी मिळत असल्याने ऐरोली, समता नगर, साईनाथ वाडी, ऐरोली नाका तसेच एमआयडीसी बाजूकडील दिघा, घणसोली व तुर्भे विभागातील काही भागात पाणी पुरवठा कमी होत असल्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. या अनुषंगाने एमआयडीसीने नियोजित पाणी पुरवठा पूर्णपणे करावा असे आयुक्तांमार्फत सूचित कऱण्यात आले व यावर एमआयडीसी मार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मान्य केले.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून एमआयडीसीकडे नागरी सुविधांकरीता विविध भूखंडांची मागणी करण्यात आली असून त्याविषयीही तत्परतेने निर्णय घ्यावा असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी या बैठकीत सूचित केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav