महावितरण दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का ? आपचा संतप्त सवाल
- by Santosh Jadhav
- Mar 25, 2022
महावितरण दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का ? आपचा संतप्त सवाल
शाळेकर विद्यार्थ्यासाठी फुटपाथवरील अर्धवट - उघड्या अवस्थेतील सर्किट बॉक्सेस धोकेदायक
फुटपाथवरील अवस्थेतील सर्किट बॉक्सेस ना हार घालून महावितरणचा आपने केला जाहीर निषेध
नवी मुंबई : शाळा फुटपाथ वरील अर्धवट - उघड्या अवस्थेतील सर्किट बॉक्सेस म्हणजे विध्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, महावितरण झोपेचं सोंग घेतेय की काय, २२ फेब्रुवारी रोजी भांडुप महावितरणला ट्विटर अकाउंटवर तक्रार करूनही तब्बल एक महिन्यात उपाय झालेला नाही.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अर्धवट - उघड्या अवस्थेतील सर्किट बॉक्सेसची दुर्दशा पाहून पालकांच्या जीवास धडकी भरतेय, हीच परिस्थिती नवी मुंबईत सर्वच ठिकाणी दिसतेय. झाकण तुटलेली, अर्धवट लावलेली, निरुपयोगी आणि जीर्ण अवस्थेतील ह्या सर्किट बॉक्सेस म्हणजे होणाऱ्या जीवितहानीस जबादार असून स्वच्छ नवी मुंबईच्या स्वप्नांवर पाणी घालण्यासारखे आहे ह्या दुरावस्थेसाठी रोष म्हणून आज नवी मुंबईतील आम आदमी पक्षाने उघड्या विदुत पेट्याना हार घालून आपला निषेध नोंदविला, यासाठी कोपरखैरणे येथील युवक आघाडीचे पदाधिकारी सुमीत कोटियान, अभिषेक पांडे आणि योग शिक्षक नीना जोहरी यांनी पुढाकार घेतला असून महावितराणाने संपूर्ण नवी मुंबईतील फुटपाथ लगत असलेलय सर्व विद्युत संच पुन्हा तपासणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा आप नवी मुंबई मिशन अर्धवट - उघड्या अवस्थेतील सर्किट बॉक्सेस नावाने आंदोलन राबवून महावितरण गाठेल असे नमूद केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav