पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात आम आदमी पक्षाने ऐरोली येथे थाळीनाद आंदोलन केले - अध्यक्ष श्यामभाऊ कदम
- by Santosh Jadhav
- Apr 17, 2022
पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात आम आदमी पक्षाने ऐरोली येथे थाळीनाद आंदोलन केले - अध्यक्ष श्यामभाऊ कदम
नवी मुंबई : शनिवारी ऐरोली नवी मुंबई येथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या सतत वाढणाऱ्या किंमती त्यामुळे वाढत चाललेली सामान्य कुटूंबांचे आर्थिक बजेट कोलमडून टाकणारी महागाई याविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करीत थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
आजच आम आदमी पार्टीचे पंजाब मुख्यमंत्री भगवंतसिंग मान ह्यांच्या कडून निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिल्या प्रमाणे पंजाब मधील सर्वच कुटुंबांना ३०० युनिट पर्यत वीज बिल माफी १ जुलै पासून चालू करण्याची घोषणा करण्यात आली.
इंधन दरवाढ कमी करणे हे केंद्र सरकारचे काम असून राज्यातील आम आदमी पक्षाच्या अखत्यारीत नसले , तरी इंधन दरवाढीमुळे , सामान्य माणसाची चालू असलेली आर्थिक कोंडी , काही प्रमाणात तरी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम आदमी पक्षाचे पंजाब व दिल्ली राज्यातील सरकार वीज , पाणी , आरोग्य , शिक्षण , महिला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोफत सुविधायुक्त उल्लेखनीय कार्य करीत आहे.
ह्या आंदोलनासाठी आप - नवी मुंबईच्या ऐरोली टीमच्या वतीने करण्यात आले होते आणि ह्या आंदोलनासाठी नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर , ऐरोली अध्यक्ष मानसी पवार , साबळे सर , सरदार कुलविंदर बिंद्राजी , सूर्यवंशी सर , युवा सक्षमीकरण अध्यक्ष डॉ. मिलिंद तांबे तसेच कोपरखैरणे येथील युवानेते सुमित कोटियन , नवी मुंबई सचिव अजिंक्य कवठेकर ह्यांनी विशेष परिश्रम घेतले असे आपचे नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Shivansh Sachin Jadhav
- वाढदिवस
- March 08
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav