रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज युवासेना बेलापूर विधानसभेतर्फे १२० दुचाकीस्वारांना मोफत पेट्रोल देऊन प्रतिकात्मक आंदोलन
- by Santosh Jadhav
- May 03, 2022
रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज युवासेना बेलापूर विधानसभेतर्फे १२० दुचाकीस्वारांना मोफत पेट्रोल देऊन प्रतिकात्मक आंदोलन
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते झोपडपट्टी सुधार मंडळ सभापती म्हाडा तसेच पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे तसेच युवासेना सचिव आणि कॉलेज कक्षप्रमुख वरून सरदेसाई आणि युवासेना बेलापूर विधानसभेचे प्रथम विधानसभा अधिकारी मयूर ब्रिद यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर विधानसभेचे नवनियुक्त युवा अधिकारी निखिल मांडवे यांच्या मार्फत आज नवी मुंबई बेलापूर विधानसभा युवासेनेच्या वतीने अक्षय तृतीया व रमजान ईदच्या मुहूर्तावर बेलापूर विधानसभेतील १२० नागरिकांना मोफत पेट्रोल भेट देऊन केंद्र सरकारच्या अनियंत्रित महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात प्रतिकात्मक निषेध युवासेना बेलापूर विधानसभेच्या वतीने करण्यात आला आहे. केंद्र शासनाने लवकरात लवकर पेट्रोल - डिझेलची इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी बेलापुर विधानसभेचे नवनियुक्त युवा अधिकारी निखिल मांडवे विधानसभा उप युवा अधिकारी आशिष वास्कर, सिद्धाराम शीलवंत , बेलापूर विधानसभा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विशाल ससाणे तसेच बेलापूर विधानसभेचे सरचिटणीस प्रवीण कांबळे, सतीश वाघमारे , समन्वयक सचिन कवडे , सुशिल सूर्वे, बेलापूर विधानसभा सोशल मीडिया अधिकारी साईनाथ वाघमारे तसेच मोठ्या संख्येने युवासैनिक व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Shivansh Sachin Jadhav
- वाढदिवस
- March 08
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav