आम आदमी पक्षाने ऐरोली मध्ये पक्ष प्रचार पदयात्रा, स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
- by Santosh Jadhav
- May 11, 2022
आम आदमी पक्षाने ऐरोली मध्ये पक्ष प्रचार पदयात्रा, स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
नवी मुंबई : पंजाब मधील उद्भुतपूर्ण घवघवीत यशानंतर, आपच्या शून्य भ्रष्टाचार विचारसरणीचा प्रसार देशभर वेगाने होत चालला असून, नवी मुंबई देखील ह्याला अपवाद नाही. रविवार ८ मे, रोजी टीम आप नवी मुंबई तर्फे, वेगवेगळ्या नोड मध्ये रॅलीज, पक्ष प्रवेश सभा, स्थानिक रहिवाशी समस्या निवारण ह्यांची रेलचेल होती.
आपच्या ऐरोली टीम तर्फे, जिल्हा उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर ह्यांच्या नेतृत्वात, पक्ष प्रचार पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. सेक्टर ५ - सहकार बाजार ते सेक्टर १० - डी-मार्ट हि पदयात्रा झाली. ह्या दरम्यान आप विचारसरणी बद्दल आणि उत्कृष्ट जनताभिमुक कामाच्या, दिल्ली मॉडेलचा प्रसार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या, तसेच पक्ष विचारसरणी आणि उत्कृष्ट नागरी सुविधाची वर्णने करणारी पत्रके वाटण्यात आली. सामान्य जनते कडून, आप विचारणीला उत्कृष्ट आणि स्वयंभू प्रतिसाद लाभत होता.
सेवानिवृत्त कामगार आयुक्त आणि आप नवी मुंबई जिल्हा मुख्य समन्वयक देवराम सूर्यवंशी तसेच जिल्हा उपाध्यक्ष मानसी पवार, मुंबई जिल्हा मुख्य अल्पसंख्यानक सेल समन्वयक ताहीर पटेल, मुख्य इव्हेंट्स समन्वयक कुलविंदर सिंग , ऐरोली नोड अध्यक्ष नामदेव साबळे, नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, घणसोली नोड महिला अध्यक्ष सविता कणसे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा ह्या रॅली मध्ये मोठा सहभाग होता.
ह्या पुढे लवकरच टीम आपच्या दिघा नोड तर्फे नोड अध्यक्ष सुनील पाटोळे ह्यांच्या तर्फे दिघा नोड मध्ये सुध्दा पदयात्रेचे नियोजन चालू आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav