संभाजीराजेंची मोठी खेळी : "मविआ"च्या २५, भाजपच्या १७ अन् इतर ४ मतांवर मांडलं राज्यसभेचं गणित
- by Santosh Jadhav
- May 12, 2022
संभाजीराजेंची मोठी खेळी : "मविआ"च्या २५, भाजपच्या १७ अन् इतर ४ मतांवर मांडलं राज्यसभेचं गणित
राज्यसभेसाठी सर्वपक्षीयांनी मदत करण्याचे आवाहन
पुणे : जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या ६ जागांची राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याची घोषणा माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढवताना राज्यसभेसाठी लागणारी आमदारांची मत आणि सध्या सर्व पक्षांकडे असलेली मत यांचे गणित मांडले आणि आपण केलेल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी राज्यसभेवर पाठवा असे आवाहनही केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेलं गणित नेमकं आहे?यानुसार २८८ / ६ = ४८. म्हणजे एक खासदार निवडून येण्यासाठी ४८ मतांची आवश्यकता आहे.
राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?
अ. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडी ४८*३ = १४४ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे २५ मत शिल्लक राहत आहेत. जर चौथा खासदार निवडून आणायचा असल्यास आणखी २३ मतांची आवश्यकता आहे.
ब. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :
तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४८*२ = ९६ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे १७ मत शिल्लक राहत आहेत. जर तिसरा खासदार निवडून आणायचा झाल्यास भाजपला आणकी ३१ मतांची आवश्यकता आहे.
क. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीची शिल्लक २५ मत, भाजपप्रणित शिल्लक १७ मत आणि इतर ४ मत याच गणितावर राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav