महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
- by Santosh Jadhav
- May 12, 2022
महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांना ३१ मे पर्यत अर्ज करता येणार आहे.
शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाल संपत आहे. तसेच जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी राज्य सभा निवडणूक होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या ६ जागंवर या खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार की याठीकाणी नवीन चेहरे दिसणार याची जनतेत उत्सुकता आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav