Breaking News
ऐरोली न. मु. म. पा. रुग्णालयातील डायलेसिस केंद्रातील अनियमितता दूर करा : प्रीती शिंदेकर - जिल्हा उपाध्यक्ष आप नवी मुंबई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या, ऐरोली विभागातील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डायलेसिस ट्रीटमेंट घेत असलेल्या १४ पेंशंट्स कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, टीम आप नवी मुंबईने डायलेसिस केंद्रामधील खालील आवश्यक तरतुदीची पूर्तता करण्याचे नम्र निवेदन वैद्यकीय अधीक्षक अधिकारी श्रीमती वर्षा राठोड ह्यांच्या कडे सुपूर्द केले.
१) एफ-६ डालझर देणे, नेफ्रो कंपनीचे महिन्याला २ डालझर देणे (२ ट्युब).
२) दर महिन्याला (रक्तवाढीस) दोन इंजेक्शन देणे,
३) योग्य कुलिंग साठी चांगल्या कंपनीचे ४ AC तावणे
४) महिन्याला २ आर्यन इंजेक्शन द्यावीत.
५) ओपीडी मधुन किडनीसाठी पण औषध लिहून देणे.
६) पेशटसाठी पलंग हा सहा फुटाचा तरी असावा.
ह्या मिटिंगच्या वेळी, टीम आप नवी मुंबई ऐरोली टीमच्या वतीने, जिल्हा उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद तांबे, निवृत्त कामगार आयुक्त आणि आप नवी मुंबई जिल्हा मुख्य समन्वयक देवराम सूर्यवंशी, ऐरोली नोड अध्यक्ष नामदेव साबळे, नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे तसेच सतीश गवळी इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांकडून ह्या बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले.
रिपोर्टर