Breaking News
एफ.जी.नाईक महाविद्यालयात लर्निग अँड अर्निंग उपक्रमा अंतर्गत विविध स्टॉलचे आयोजन
श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी.नाईक महाविद्यालयात महिला विकास कक्ष अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी लार्निंग आणि अर्निंग उपक्रम संपन्न झाला.
सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश हा महिला सक्षमीकरण असून शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनवणे व अशा विविध उपक्रमाद्वारे त्यांना प्रोत्साहित करून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होय.
सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिकसर यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी या सण-उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यानी विविध स्टॉल लावून स्वतःची कला सादर केली.
ह्या स्टॉलमध्ये दिवाळीचे विविध स्वादिष्ट फराळाचे पदार्थ, ज्वेलरी, मेहेंदी, रांगोळी, स्केचेस, गृह उपयोगी वस्तू यांचा समावेश होता.
प्रस्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिक यांनी महिला विकास कक्ष अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत त्यामागील महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली तसेच जर का विद्यार्थिनींना सक्षम करायचं असेल तर त्यांचा शैक्षणिक, सामाजिक विकास हा खूप महत्त्वपूर्ण आहे व त्यातूनच त्या अर्थजन प्राप्त करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करून स्वतःच्या स्वप्नांची व ध्येयाची स्वच्छंदी भरारी घेऊ शकतात हे मत व्यक्त करत, विद्यार्थिनींनी आजच्या उपक्रमामध्ये आपल्या कला कौशल्याने विविध साहित्याचे स्टॉल लावले होते, त्याचे कौतुक केले व भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यानी स्वहस्ते केलेल्या ह्या वस्तू आणि जिन्नस स्वतःचे कौशल्य, सादरीकरण, मार्केटिंग स्किल, स्वादिष्ट चव ह्या विविध निकषांवर विकून दाखवले. त्याचबरोबर संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी- शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन उपक्रम यशस्वी संपन्न झाला.
सदर उपक्रमा अंतर्गत प्रथम क्रमांक द्वितीय कला शाखेतील गायत्री म्हात्रे, विनाया जाधव तसेच द्वितीय क्रमांक तृतीय कला शाखेतील कीर्ती साळुंखे, ज्योती पाटील व आरती बेले तसेच तृतीय क्रमांक द्वितीय कला शाखेतील दिशा सावंत व आलिषा मेर यांनी पटकावला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विकास कक्ष सदस्य प्रा.स्वाती हैलकर, प्रा. चिन्मयी वैद्य तसेच सदर कार्यक्रमाचे परीक्षण प्रा.समिधा पाटील व प्रा.प्राजक्ता सावंत यांनी केले.
रिपोर्टर