अन्नदानाने पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- by Santosh Jadhav
- May 17, 2022
अन्नदानाने पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
उरण : ( विठ्ठल ममताबादे ) पत्रकार, पोलिसमित्र, सामाजिक कार्यकर्ते, लेखक म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुपरिचित असलेले पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस उरण चारफाटा येथे झोपडपट्टीतील लहान मुलांना अन्नदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अन्नदान करून पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा वाढदिवस अन्नदान करून साजरा करण्यात आला.
सुफल आहार या संस्थेच्या माध्यमातून दररोज चारफाटा उरण येथील मुलांना एकवेळचे दुपारचे पौष्टिक अन्न दिले जाते. समाजातील अनेक नागरिक, विविध सामाजिक संस्था येथे अन्नदान करीत असतात. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या माध्यमातून वाढदिवसा निमित्त एका दिवसाचे एकवेळचे दुपारचे जेवण लहान मुलांना देण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष विकी पाटील, उत्कृष्ट समलोचक सुनिल वर्तक, सदस्य - अभय पाटील, सादिक शेख, सागर घरत, गणेश ठाकूर, सुफल आहाराचे विकास शर्मा, स्मिता नाखवा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनेक नागरिकांनी, विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी सोशल मीडियाद्वारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav