मध्य प्रदेशात खातं उघडून आपची दणक्यात एन्ट्री ; केजरीवालांचा भाजपला हादरा
- by Santosh Jadhav
- Jul 17, 2022
मध्य प्रदेशात खातं उघडून आपची दणक्यात एन्ट्री ; केजरीवालांचा भाजपला हादरा
भोपाळ : मध्य प्रदेशातील सिंघरौलीमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. येथे महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. आपच्या रानी अग्रवाल यांनी भाजपच्या चंद्र प्रताप विश्वकर्मा यांना तब्बल ९३५२ मतांनी हरवलं आहे. ही जागा आधी भाजपच्या अखत्यारित होती. मात्र आपने भाजपच्या किल्ल्याला धक्का दिला आहे. यासह मध्य प्रदेशात आपची पहिली महापौर निवडून आली आहे.
सिंगरौलीच्या नवनियुक्त महापौर रानी अग्रवाल मारवाडी कुटुंबाशी संबंधित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या समाजकार्य आणि राजकारणात सक्रीय आहेत. रानी यांनी पहिली निवडणूक २०१४ ला जिल्हा पंचायत सदस्य म्हणून लढली होती. यात त्यांना यश मिळालं होतं. रानी यांना जिल्हा पंचायतच्या अध्यक्षांइतके मतं मिळाले होते. मात्र ट्रायमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.
यानंतर २०१८ मध्ये रानी या आपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत उभ्या राहिल्या. मात्र याही वेळी खूप कमी मतांनी निवडणूक हरल्या. तेव्हापासून त्या या क्षेत्रात सक्रिय आहे. यंदाही आम आदमी पक्षाने दुसऱ्यांना महापौरपदासाठी उमेदवार उभा केला आणि यंदा त्यांना यश मिळालं. इतकच नाही तर या भागातून आपचे अनेक नगरसेवकही विजयी झाले आहेत.
निवडणुकीत उमेदवार घोषित केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे रोड शो केला होता. त्यांनी रानी अग्रवाल यांचा निवडणुकीत प्रचार केला होता. दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बीडी शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रोड शो केला होता आणि आपला उमेदवाराच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav