नवी मुंबई आपकडून ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली - आपचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम
- by Santosh Jadhav
- Aug 16, 2022
नवी मुंबई आपकडून ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली - आपचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम
नवी मुंबई : प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, टीम आप नवी मुंबईकडून ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. ह्या रॅलीमध्ये टीम आप नवी मुंबईच्या सर्व कार्यकर्त्याकडून मोठ्या संख्येने आणि उत्साहाने प्रतिसाद मिळाला. ह्या रॅलीमुळे आम आदमी पक्षाची नवी मुंबईत झपाट्याने होत असलेली वाढ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे नवी मुंबई आपचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी सांगितले.
रॅलीची सुरवात दिघा तलावाजवळील , छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भित्तिचित्राला हार घालून करण्यात आली. ह्या रॅलीसाठी आम आदमी पक्षाचे दिघा येथील वॉर्ड अध्यक्ष संतोष केदारे ह्यांच्या दिघा टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या नंतर हि रॅली, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरुळ मधील प्रत्येक वॉर्ड अध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार ह्यांच्या वॉर्ड मधून फिरविण्यात आली.
ह्या रॅलीत, ऐरोली येथून प्रीती शिंदेकर, देवराम सूर्यवंशी, कुलविंदरसिंग, आरती सोनावणे, नामदेव साबळे, मानसी पवार, मिलिंद तांबे, गायत्री तांबे, घणसोली येथून महेंद्र कणसे, दत्तू संकपाळ, कोपरखैरणे येथून सुमित कोटियन, नीना जोहरी, अभिषेक पांडे, डॉली बच्चन, मधू चावला, आरती सिंग तसेच रोहन अब्राहम, सुजित पांडे, सुनील जाधव, चिन्मय गोडे, विलास उजगरे, स्नेहा उजगरे, रीथा जॉन, महेश क्षीरसागर इत्यादी संभाव्य उमेदवारांचा समावेश होता.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav