आप महाराष्ट्र - युवा आघाडीत नवी मुंबईच्या युवांचा पण समावेश
- by Santosh Jadhav
- Aug 26, 2022
आप महाराष्ट्र - युवा आघाडीत नवी मुंबईच्या युवांचा पण समावेश
पुणे येथील , संपुर्ण महाराष्ट्रातून प्रचंड संख्येने जमा झालेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या यशस्वी आयोजन नंतर, दिनांक २४ ऑगस्ट रोजी, आप महाराष्ट्र युवा आघाडी तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नवीन युवा समित्या जाहीर करण्यात आल्या.
ह्या जिल्हा स्तरीय समित्यांमध्ये , नवी मुंबईतील सक्रिय कार्यकर्ते संतोष केदारे - दिघा ह्यांची आप नवी मुंबई - युवा आघाडी अध्यक्ष तसेच सुनील जाधव - तुर्भे ह्यांची संघटक, आणि आभिषेक पांडे - कोपरखैरणे ह्यांची सहसंघटक आप महाराष्ट्र तसेच चिन्मय गोडे नेरुळ ह्यांची ठाणे जिल्हा संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली. ह्या शिवाय, नवी मुंबई युवा टीम मध्ये, अजूनही काही सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश असावा अशी विनंती नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी संघटक ताहीर पटेल ह्यांना केली आहे.
युवा आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दिघा येथील लोकप्रिय समाजसेवक संतोष केदारे ह्यांच्या युवा आघाडी अध्यक्ष पदाच्या नेतृत्वात टीम आप - नवी मुंबई, युवकांपर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आम आदमी पक्षाची ध्येय आणि धोरणे ह्यांचा प्रसार करील आणि जास्तीत जास्त युवकांचा टीम आप नवी मुंबई मध्ये समावेश करत राहील ह्याची मला खात्री आहे - श्यामभाऊ कदम
सतत कार्यकर्त्यांच्या टीममध्ये वेढलेल्या आमच्या संतोष केदारे ह्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा - देवराम सूर्यवंशी - मुख्य ट्रेंड युनियन संघटक-आप नवी मुंबई आणि निवृत्त कामगार आयुक्त
मला दिलेल्या नवी मुंबई युवा आघाडीच्या नवीन जबाबदारी बद्दल, समस्त दिघा टीमच्या वतीने आभार सर्व वरिष्ठ आणि युवा टीम ह्यांना सोबत घेऊन नवी मुंबईत सर्वांच्या विचाराने पक्ष वाढीसाठी काम करू व आम आदमी पक्षाला नवी मुंबईत नंबर वर करून दाखवू - संतोष केदारे
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav