गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
- by Santosh Jadhav
- Mar 25, 2021
गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात दीडपट वाढ करण्याच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे वाढीव दर १ जुलै २०२१ पासून लागू होतील. गौण खनिजाच्या स्वामित्वधनाचे दर खालील प्रमाणे असतील.
१ ) बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्टयांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेला चुना रुपये ६००/- प्रति ब्रास.
२ ) उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड मग त्याचा आकार केवढाही असो आणि दगडाची भूकटी रुपये ६००/- प्रति ब्रास.
३ ) बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड ( लॅटराईट स्टोन ) रुपये १५० /- प्रति ब्रास.
४ ) (क) उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे , बारीक खडी , मुरूम , कंकर रु. ६००/- प्रति ब्रास.
(ख) केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरीता वापरण्यात येणार चॅल्सेडोनी खडे रु. ३०००/- प्रति ब्रास.
(ग) पुढील प्रयोजनाकरिता वापरण्यात न येणारी सर्वसामान्य वाळू.
सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे , धातुशास्त्रीय , दृष्टिविषयक , कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या , सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी, मातीची भांडी व काच सामान तयार करण्यासाठी , मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता रुपये १२००/- प्रति ब्रास आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता रुपये ६००/- प्रति ब्रास.
५ ) कौले ( मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची ) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती रुपये ६००/- प्रति ब्रास.
६ ) अंतर्गत बंधारे , रस्ते , लोहमार्ग व इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी / भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती रुपये ६०० /- प्रति ब्रास.
७ ) बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते, त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक रुपये 600/- प्रति ब्रास.
८ ) विटा तयार करण्याच्या व इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती , गाळ व सर्व प्रकारची चिकणमाती , इत्यादी रुपये २४० /- प्रति ब्रास.
९ ) फुलरची माती किंवा बेटोनाईट रुपये १५०० /- प्रति ब्रास.
१० ) सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगड ( ग्रॅनाईट वगळून ) रुपये ३०००/- प्रति ब्रास
११ ) इतर सर्व गौण खनिज ( ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने दिनांक १०/०२/२०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून ) रुपये ६००/- प्रति ब्रास.
सर्व गौण खनिजे ( ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने दिनांक १०/०२/२०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून ) रु. ९००० प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी ठोकबंद भाडे आकारण्यात येईल.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav