कोपरखैरणे - घणसोली रस्ता रुंदीकरणासाठी २२ झाडे हटविण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावावर आम आदमी पक्षाकडून लेखी हरकत - आपचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम
- by Santosh Jadhav
- Sep 20, 2022
कोपरखैरणे - घणसोली रस्ता रुंदीकरणासाठी २२ झाडे हटविण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावावर आम आदमी पक्षाकडून लेखी हरकत - आपचे अध्यक्ष श्यामभाऊ कदम
नवी मुंबई : नवी मुबई हे एकविसाव्या शतकातील शहर आहे असे बिरुद नवी मुंबई महानगरपालिका मिरवीत असते, आणि ते काही प्रमाणात नक्कीच सत्य देखील आहे. पण नवी मुंबई हे शहर इतर शहरांप्रमाणे, फक्त सिमेंट जंगल न बनता, एक पर्यावरण समतोल राखणारे आधुनिक शहर बनावे हि माफक अपेक्षा, आयुष्य भरातील मेहनतीच्या कमाईचे लाखो रुपये खर्च करून नवी मुंबईत घर घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे. मग ह्या पार्शवभूमीवर, २२ झाडांची कत्तल, नक्कीच समर्थनीय नाही, रस्ता रुंदीकरणासाठी पर्यायी व्यवस्था नक्कीच होऊ शकते.
आम आदमी पक्षाचे नवी मुंबई घणसोली नोड अध्यक्ष रमेश औताडे ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार कोपरखैरणे - घणसोली रस्ता रुंदीकरणासाठी २२ झाडे हटविण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावावर, सूचना / हरकती / आक्षेप असल्यास सात दिवसात लेखी स्वरूपात घणसोली विभागात सुपूर्द करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभाग तर्फे करण्यात आले. ह्याला प्रतिसाद म्हणून, हा लेखी आक्षेप आम आदमी पक्ष नवी मुंबईच्या वतीने घेण्यात आला.
ह्या मुळे, कोपरखैरणे - घणसोली रस्ता रुंदीकरणासाठी २२ झाडे हटविण्याच्या पालिकेचा प्रस्ताव रद्द करून पर्यायी व्यवस्था करावी अशी नम्र मागणी आम आदमी पक्ष नवी मुंबईच्या वतीने, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर ह्यांच्याकडे आपचे नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम ह्यांनी इमेल द्वारा केली आहे.
ह्या पूर्वी देखील, आम आदमी पक्ष नवी मुंबई कडून पामबीच रोडवरील आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीस लेखी हरकत घेत विरोध प्रगट केला होता.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav