Breaking News
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधित, आप नवी मुंबई तर्फे, महिला रिक्षा चालकांचा सत्कार
टीम आप नवी मुंबई तर्फे, दर वर्षी दि. ८ मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची प्रथा आहे. ह्या वर्षी, ह्या दिवसाचे औचित्य साधत, महिला रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. ह्या पूर्वी पासून सुध्दा, १५ ऑगस्टचे ध्वजारोहण,पालिकेच्या सफाई कामगार महिले तर्फे, करण्याची प्रथा आप नवी मुंबईने सुरु केलेली आहेच.
आजच्या घडीला, नवी मुंबईच्या सर्वच प्रभागातून, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर आपमध्ये सामील होत आहेत. आपल्या चिमुकल्यांसाठी दिल्लीच्या आप सरकारसारखी, मनीष सिसोदिया ह्यांची शिक्षण आणि सत्येन्द्र जैन ह्यांची आरोग्य व्यवस्था, जी जगमान्य, उत्कृष्ट आणि मोफत आहेेे, ती फक्त आप आणि आप शासनच देऊ शकते, ह्याची खात्री ह्या महिलांना झाल्यामुळेच ह्या महिला आपच्या विचारधारेकडे आकृष्ट झाल्या आहेत.
ह्या सत्कार आणि पक्ष प्रवेश समारंभ कोपरखैरणे येथील, शांतिदूत महावीर उद्यान, सेक्टर २३ येथे टीम आप नवी मुंबई तर्फे आयोजित करण्यात आला होता. ह्या प्रसंगी, साधारण ४० च्या वर महिला ऑटो चालकांनी समारंभात उत्साहात भाग घेतला. महिलांसाठी हा एक वेगळी वाट चोखाळणारा, व्यवसाय करीत असताना आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांचे कथन केले. काही अपवाद वगळता, एकंदरीत, त्याचा सूर हा, समाज त्यांना उत्तेजनच देत असतो हा होता.
सुजाता पाटील, सावित्री डोंगरे, रवाना मुलांनी, ज्योती राठोड, रेश्मा मुल्ला, रेश्मा जोशी, संजना चव्हाण आणि त्यांच्या इतर सहकारी महिला रिक्षा चालक, अश्या साधारण ४० महिला ह्या प्रसंगी उपस्थित होत्या. टीम आप नवी मुंबई कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्याची उपस्थिती पण मोठ्या प्रमाणावर होती.
ह्या सत्कार समारंभाचे आयोजन, जिल्हा सहसचिव नीना जोहरी, तसेच आप कोपरखैरणे टीम मधील किरण कुंदारे, छगन पटेल, मधू चावला, आरती सिंग आणी इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
रिपोर्टर