Breaking News
कोव्हिशिल्ड बनविणाऱ्या सिरमला आता कोर्टात खेचणार पालक
नवी मुंबई : कोव्हिशिल्डमुळे साईड इफेक्ट असल्याचे खुद्द ही लस बनविणाऱ्या ऍस्ट्राझिनेका या कंपनीनेच मान्य केल्याने भारतात ही लस बनविणारी सीरम इन्स्टिट्यूट कंपनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर भारतात दोन मुलींचा मृत्यू झाला होता. या मुलींचे पालक आता सीरमला कोर्टात खेचण्याची तयारी करत आहेत.
कोरोना काळातच कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला होता. आता या मुलींच्या वडिलांनी सीरमविरोधात दावा ठोकण्याचे जाहीर केले आहे. ऋतिका श्री ऑम्ट्री आणि करुण्या अशी या दोन मुलींची नावे आहेत. त्यांचा कोरोना काळात लस घेतल्यानंतर काही दिवसांत मृत्यू झाला होता.
रिपोर्टर