सृष्टीची शिक्षणात उत्तुंग भरारी
- by Santosh Jadhav
- May 30, 2024
सृष्टीची शिक्षणात उत्तुंग भरारी
महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष कै. विशाल आनंद शेले यांची द्वितीय कन्या सृष्टी विशाल शेले हिला एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये ९१.८०% मिळाले, ज्ञानदीप विद्यामंदिर खेड भडगाव या शाळेची विद्यार्थिनी असून आईने केलेले उत्तम मार्गदर्शन, सर्व शिक्षक वर्ग व तिच्या प्रयत्नाने हे यश सृष्टीने संपादन केले आहे.
तिची काकी सौ. संध्या विक्रम शेले या जिल्हा परिषद शाळा ढागर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत , काका हे मंडणगड तालुक्यातील दहागाव प्रशालेमध्ये गणित विषयाचे शिक्षक आहेत त्यांच्याशी संवाद साधला असता सृष्टीची टक्केवारी तिच्या अथक परिश्रमामुळे मिळालेली आहे. त्याबद्दल आमच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिची आजी, मामा, आत्या व सर्व चुलत काका , काकी यांच्याकडून सृष्टीवर अभिनंदनचा वर्षाव होत असून सृष्टीला पुढील शिक्षणासाठी परिवाराने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav