Breaking News
नामदेव भगत यांनी घेतली खासदार नरेश मस्के यांची भेट
ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी खासदार नरेश मस्के यांच्या ठाणे कार्यालयामध्ये भेट घेतली.
नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमाणिकपणे काम केलं आहे , त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी सुद्धा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत व त्यांचे कार्यकर्ते यांचे सुद्धा आभार मानले आहे. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा मोठा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.
या दोघांमध्ये राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
रिपोर्टर