बेलदार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
- by Santosh Jadhav
- Jul 10, 2024
बेलदार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
अकोला येथे दि ७ जुलै रोजी शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी बेलदार समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष जानकीराम पांडे , बेंगलोर येथे राज्य राखीव पोलीस दलात निरीक्षक म्हणून कार्यरत भावलाल इंदोरे, समर्थ मिलिटरी अकॅडमीचे पुरुषोत्तम बिलेवार, एलआयसीतील प्रतिष्ठित मुक्त विमा सल्लागार तुकाराम पांडे, अमरावती येथील पुरुषोत्तम मांजरे, पि.एम. भगेवारसर , बाळकृष्ण भगेवार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप बिल्लेवार , उद्घाटक म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कुलट होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष श्रीराम भोंगरे, सचिव सुरज भगेवार, संघटक गजाननराव तलवारे, उपाध्यक्ष केशवराव बिलेवार, कार्याध्यक्ष महादेवराव मेहेंगे , सहसचिव सुरज मेंगे , अविनाश थोप, शिवा भोंगरे, गणेश थोप, ललिता मेहंगे, माधुरी बघे, हरीश मेहेंगे यांनी उत्कृष्ट आयोजन केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav