"कोरोनाचे नियम पाळताय ना? विद्यार्थ्यांनो आपल्या पालकांना विचारा", राजेश टोपेंची साद
- by Saptahik Kokan Samana
- Feb 24, 2021
मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक पत्र आपल्या ट्विटर वरून शेअर केलंय ज्यात त्यांनी खेळण्या बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना घरातच राहावं लागतेय यावर खंत व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी मुला मुलींना कोरोनावर मात करण्यासाठी मदत देखील मागीतली आहे. ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरून येणाऱ्या पालकांनी हात पाय स्वच्छ धुतलेत का? शिवाय पालक कोरोनाचे नियम पाळत आहेत का? याची पाहणी करण्याच आवाहन त्यांनी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या संदर्भातील पत्र त्यांनी ट्वीट केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये राजेश टोपे म्हणाले, "कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमचीच काळजी घ्या पण त्याचबरोबर आई-वडिलांची, भाऊ- बहिणींची तसेच शेजाऱ्यांची काळजी घ्या. आई- वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेरून आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत की नाही ते पाहा. त्यांनी मास्क वापरलं की नाही ते देखील पाहा. त्यांना कोरोनाची काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेवून जा. आजचा विद्यार्थी हा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणाचं शरीर सुदृढ, मन सकारात्मक आणि बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो."
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana