Breaking News
भारत आणि चीन या दोन देशांतील सैन्यादरम्यान गेल्या वर्षी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात हिंसाचार झाला होता. आता त्याचा एक व्हिडीओ चीनने रीलीज केला आहे. त्यामध्ये कॅप्टन सोयबा मनिग्बा हे चीनी सैनिकांना भारी पडताना दिसताहेत. आता मनिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी कॅप्टन सोयबा मनिग्बा यांचा सत्कार केला आहे.
कॅप्टन सोयबा मनिग्बा हे मनिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या धाडसाचे कौतुक करताना मनिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले की, "कॅप्टन सोयबा मनिग्बा यांचे कार्य राज्यासाठी आणि देशासाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी राज्याने आपले अनेक सुपुत्र दिले आहेत."
रिपोर्टर