स्मशानभूमी व नाना नानी पार्कची साफसफाई
- by Saptahik Kokan Samana
- Jul 21, 2021
स्मशानभूमी व नाना नानी पार्कची साफसफाई
उरण : लव्हर पॉईंट ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून बांधपाडा(खोपटे )येथील स्मशानभूमी व नाना नानी पार्क येथील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टीमुळे स्मशानभूमी तसेच नाना नानी पार्क येथे चिखल व कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. शिवाय गवत झाडे झुडपे यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली होती. उरण पूर्व विभागातील नागरिक दशक्रिया विधीसाठी खाडीलगत असलेल्या नाना नानी पार्क येथे येत असतात.त्यामुळे सदर परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा. कोणत्याही प्रकारचे रोग पसरू नयेत या दृष्टिकोनातून नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लवर पॉइंट ग्रुप व फ्रेंड्स ग्रुप या उरण तालुक्यातील खोपटे गावातील संस्थेतर्फे स्मशानभूमी व नाना नानी पार्क येथे साफसफाई करण्यात आले.साफसफाई केल्याने सदर परिसर स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.सध्या सामाजिक कार्यात नवतरुणांचा सहभाग वाढत असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana