ओमकार कोळीने पटकाविले जलतरण स्पर्धेत गोल्डमेडल
- by Santosh Jadhav
- Mar 22, 2022
ओमकार कोळीने पटकाविले जलतरण स्पर्धेत गोल्डमेडल
उरण : (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्याचे सुपुत्र, करंजा सुरकीचा पाडा येथील रहिवाशी कु. ओमकार सदानंद कोळी यांनी स्नेहानगर, स्विमिंग पूल धुळे येथे झालेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर फ्रीस्टाईल आणि २०० मीटर मिडले रिले, २०० मीटर फ्री स्टाईल रिले यामध्ये ५ गोल्ड मेडल पटकाविले आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्र मधून केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावून ओमकार कोळी यांनी उरणचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेले आहे. गोल्ड मेडल मिळाल्याने ओमकार सदानंद कोळी यांच्यावर विविध स्तरातून, विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मित्र परिवार, नातेवाईक, चाहत्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी सोशल मीडिया द्वारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav