कामोठे कॉलोनी फोरमच्या पनवेल महानगर पालिका आणि सिडकोच्या दुहेरी चार्जेस बंद करण्याच्या मागणीला आपचा पाठिंबा
- by Santosh Jadhav
- Mar 27, 2022
कामोठे कॉलोनी फोरमच्या पनवेल महानगर पालिका आणि सिडकोच्या दुहेरी चार्जेस बंद करण्याच्या मागणीला आपचा पाठिंबा
नगरसेविका लीना गरड ह्यांना आम आदमी पक्षात सामील होण्याचे जाहीर आवाहन केले
पनवेल : पनवेल महानगर पालिका आणि सिडकोच्या दुहेरी चार्जेस बंद करण्याच्या मागणीसाठी कामोठे कॉलोनी फोरमच्या अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिका नगरसेविका लीना गरड ह्या शनिवार दिनांक २६ मार्च रोजी लाक्षणिक उपोषणास बसल्या होत्या.
एकतर पनवेल महानगर पालिका हि ' ड ' वर्गात मोडत असून सुध्दा कर आकारणी अवास्तव आहे, त्याचा प्रमाणे सिडकोकडून सुध्दा कर आकारणी होत असून अशी दुहेरी कर आकारणी नागरिकांसाठी अन्याय कारक आहे. ह्यामुळे स्थानीय नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आम आदमी पक्ष - पनवेल तर्फे स्थानिक नागरिकांच्या ह्या न्याय मागणीसाठी नगरसेविका लीना गरड ह्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. ह्या प्रसंगी आप तर्फे पनवेल , नवी मुंबई , ठाणे , कल्याण - डोंबिवली , भिवंडी येथील आप कार्यकर्त्यानी मोठया प्रमाणावर हजेरी लावली होती. ह्या प्रसंगी आप - पनवेलचे जेष्ठ प्रचारक चिमाजी शिंदे ह्यांनी नगरसेविका लीना गरड ह्यांना आम आदमी पक्षात सामील होण्याचे जाहीर आवाहन केले.
कामोठे कॉलोनी फोरमच्या दुहेरी आणि अवास्तव कर आकारणीच्या न्याय मागणीच्या लढ्यात, आप - पनवेल नेहमीच स्थानीय नागरिकांच्या पाठी राहील असे आश्वासन जयसिंग शेरे - अध्यक्ष-आप पनवेल ह्यांच्या तर्फे देण्यात आले.
ह्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आप नवी मुंबईतून सुध्दा युवा नेते सुमित कोटियन , अभिषेक पांडे , सुनील जाधव , राहुल मेहरोलिया , रमेश गुप्ता तसेच जेष्ठ नेते सुभाष कोटियन , डॉक्टर देशमुख , राजीव सिन्हा आणि इतर कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav