एफ.जी.नाईक महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी "मराठी वाड्मय मंडळ" आणि "सांस्कृतिक समिती"चा उद्घाटन सोहळा
- by Saptahik Kokan Samana
- Jul 21, 2021
एफ.जी.नाईक महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी "मराठी वाड्मय मंडळ" आणि "सांस्कृतिक समिती"चा उद्घाटन सोहळा
नवी मुंबई : एफ. जी. नाईक महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळ व सांस्कृतिक विभाग या दोन विभागांचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाला. नमुद कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. प्रताप महाडीक, मराठी वाड्मय मंडळ प्रमुख प्रा. समिधा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. योगिता पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रा. संगीता वास्कर यांनी सुरबद्ध केलेल्या सरस्वती स्तवनाने झाली. तद्नंतर प्राचार्य प्रताप महाडिक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना, महाविद्यालयीन पुस्तकी शिक्षण देतानाच महाविद्यालयातील इतर विभागांचे समन्वयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती करून देण्यात आली. सदर प्रसंगी आषाढी एकादशीचे महत्व, आपल्या विकासामध्ये वैज्ञानिकतेच्या मार्गावरून प्रवास करताना धार्मिक वैचारिकतेची भूमिका व आवश्यकता, त्यामुळे आपल्या कार्यशैलीवर होणार सकारात्मक परिणाम याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कोरोना कालावधीमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता महाविद्यालयाचे वतीने ऑनलाईन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहर्ष सहभाग घेऊन आपला शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक विकास साध्य करावा असे आवाहन केले. तसेच कोरोना कालावधीमध्ये शासन व स्थानिक प्रशासनाचे वतीने निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचना व आदेशांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे याबाबत सूचित केले.
नमुद कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य विद्याशाखेतील कु. भुपेश देवरे,कु. ईश्वर कदम, आणि तृतीय वर्ष वाणिज्य विद्याशाखेतील कु. चैतन्य उखरांडे आणि कु.मयुरी मोरे या विद्यार्थ्याने विठलाचे सुस्वर भक्तीगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेले कु. श्रद्धा राजहंस आणि कु.नमिता हटकर या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासामध्ये महाविद्यालयाचा वाटा किती मोठा आहे याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कोरोना सारख्या महामारीतून जगाची लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी विठ्ठलकडे साकडे घातले.
नमुद कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रा. योगिता पाटील यांनी सांभाळली तर कार्यक्रमाअंती आभार प्रदर्शन प्रा. समिधा पाटील यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana