Breaking News
तुर्भे मधील शिवसेना, भाजपा मध्ये लवकरच अनेक राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा प्रवेश?
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील तुर्भे विभाग सध्या राजकीय आखाडा बनला असून, येत्या ऑगस्ट महिन्यात अथवा तत्पूर्वी तुर्भे मधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर पक्षातील अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक पदाधिकारी - कार्यकर्ते शिवसेना मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस मधील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा आणि शिवसेना मध्ये दाखल होणार असल्याने येत्या काही महिन्यात नवी मुंबई मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर पक्ष नावापुरते उरणार असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक एप्रिल- २०२० मध्ये लागेल, अशी अटकळ बांधून अनेक राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी पक्षांतर केले. निवडणुकीची धामधूम चालू असताना आचारसंहिता लागेल या विचारात असताना कोविड १९ मुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागले. निवडणूका पुढे पुढे ढकलत चालल्या आहेत.
नवी मुंबई शहरात कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून, नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन त्यादृष्टीने निवडणुकीचे कामकाज करत आहेत, असे महापालिका अधिकारी सांगत आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर भाजपा उमेदवार शिवसेना मध्ये प्रवेश करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे ?
रिपोर्टर