Breaking News
लखीमपूर खिरी हत्याकांड, गाड्या अंगावर घालून बळीराजाला चिरडण्याचा घटनेवर, आप नवी मुंबई तर्फे आक्रोश आंदोलन
शनिवार दि ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी, शिवाजी चौक - वाशी येथे आप नवी मुंबई तर्फे हल्लीच झालेल्या, लखीमपूर हत्याकांडाच्या निर्दय घटनेवर, आप नवी मुंबई तर्फे आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले. ह्या प्रसंगी कार्यकर्त्या तर्फे ह्या घडवून आणलेल्या ह्या पाच आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्र आणि उत्तर प्रदेशचे राज्य सरकार ह्याच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा ह्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तसेच हे हत्याकांड घडवून आणणाऱ्या त्याचा मुलगा आशिष मिश्रा ह्याच्या फाशीच्या शिक्षेची पण मागणी करण्यात आली.
सव्वाशे कोटी पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या खन्डप्राय देशाचा गृहराज्य मंत्री, म्हणजे एव्हड्या उच्च पदावरची व्यक्ती, आंदोलक शेतकर्या विरुद्ध, एका गल्लीछाप लीडर सारखं, भडकावू भाषण देते, आणि लगेचच त्या व्यक्तीचा मुलगा गाड्यांचा ताफा घेऊन जाऊन, शांततापूर्ण मार्गाने आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित प्रश्न मांडणाऱ्या, शेतकऱ्यांना, निर्दयपणे चिरडून मारतो. आणि घटनेला आज जवळ जवळ एक आठवडा उलटून सुध्दा हि दोघे उजळ माथ्याने वावरत होते, खोटे नाटे कांगावे करीत होते. अरे कुठे नेऊन ठेवला आहे देश माझा, असं विचारण्याची पाळी जनतेवर आलेली आहे. श्यामभाऊ कदम , कार्यकारी अध्यक्ष - आप नवी मुंबई.
हत्याकांडाचे चित्रण तेथे उपस्थित असलेल्या एका शेतकऱ्याने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्याकडे दिले . हे चित्रीकरण देशभर पसरल्यावर संपूर्ण देशात भाजप विरुद्ध संतापाची लाट पसरली आहे व देशभरात आम आदमी पक्ष सत्ताधारी भाजप विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत आहे. - चिन्मय गोडे - सह-सचिव युवा विभाग - आप नवी मुंबई.
दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी लखीमपूर येथील खिरी ह्या गावी शेतकरी बांधवांनी त्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन केले. पण त्यांना न्याय तर दिलाच नाही उलटपक्षी आंदोलनात ८ जणांना गाडीनी चिरडून टाकले गेले. हे पाहता असे लक्षात येते की त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचा आम आदमी पक्ष हा शेतकरी बांधवांना पाठिंबा देत आहे. कारण शेतकरी मित्र थांबला तर देश संपला. सौ.मानसी राऊत (पवार), विभागीय अध्यक्ष-ऐरोली-दिघा,आप नवी मुंबई.
आंदोलनाचा कार्यक्रम शांतीपूर्ण पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे विशष सहकार्य केल्या बद्दल, आप नवी मुंबई तर्फे वाशी पोलीस आणि पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त केले.
रिपोर्टर