प्रकाश पाटील यांची उरण शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड
- by Santosh Jadhav
- Feb 04, 2022
प्रकाश पाटील यांची उरण शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड
उरण : उरण शहरचे काँग्रेसचे निष्ठावंत डॅशिंग व उत्तम वक्ते, स्वर्गीय बैरिस्टर ए आर अंतूले यांचे कट्टर समर्थक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, मनमिळावू व सर्वांना हसविणारे व्यक्तिमत्व असलेले प्रकाश पाटील यांची निवड उरण शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी दि ०३/०२/२०२२ रोजी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या कार्यालयात महेंद्र घरत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. १९९६ साली शहराचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यावेळी युवकांना संघटित करून पक्षासाठी भरीव काम केले. सुरवातीपासून ते आजपर्यंत ते एकाच पक्षात राहून एकनिष्ठेने प्रामाणिकपणे पक्षाचा प्रचार, प्रसार केला. पक्षाच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले. पक्षाच्या प्रत्येक आंदोलन, संपात त्यांनी सहभाग घेतला त्यामुळे त्यांची निवड उरण शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आल्याची माहिती यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिली.
काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुकाध्यक्ष जे डी जोशी, गणेश सेवक, अकलाख शिलोत्री, राम भगत, जितेश म्हात्रे, शैलेश तामगाडगे, गुफरान तुंगेकर, महेश भोईर, नागेश कांबळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.काँगेसच्या पदाधिकारी सदस्यांनी प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav