केरळमध्ये दोन गटांत हाणामारी, आरएसएस कार्यकर्त्याचा मृत्यू
- by Saptahik Kokan Samana
- Feb 25, 2021
केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात बुधवारी रात्री दोन समूहांदरम्यान झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत केरळ विधानसभा निवडणूक २०२१ साठी तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन समूहांत झालेल्या हिंसाचारात "राष्ट्रीय स्वयंसेवक" संघाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
चेर्थला भागाजवळ नगमकुलनगरा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांमध्ये हा हिंसाचार झाला. या हिंसाचारात आरएसएसचा कार्यकर्ता 'नंदू' याचा मृत्यू झाला. एसडीपीआय ही इस्लामिक संघटना पीएफआयची राजकीय संघटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आणखीही काही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एसडीपीआयच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
ही घटना समोर आल्यानंतर केरळचे भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी आरएसएस कार्यकर्त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. या हत्येसाठी पीएफआय जबाबदार असल्याचं सुरेंद्रन यांनी म्हटलंय.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana