पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे कळंबोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
- by Santosh Jadhav
- Feb 09, 2022
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे कळंबोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
उरण : (विठ्ठल ममताबादे )बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोणातून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान न्यू इंग्लिश स्कुल कळंबोली, द. ग. तटकरे प्लॉट नंबर 5, सेक्टर 5 ई , कळंबोली येथे भव्य दिव्य असे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात आय सी आय सी आय बँक, पेटीएम, लेट्स ट्रान्सपोर्ट यामध्ये बॅक ऑफिस, फिल्ड वर्क, मार्केटिंग क्षेत्रातील पदे असून 10 वी ते पदवीधर असलेले युवक युवती यासाठी मेळाव्यात भाग घेऊ शकतात. युवकांनी येताना सोबत बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो घेऊन मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक -सूरदास गोवारी महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आयोजक संतोष शेट्टी -अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9833688573 या नंबरवर संपर्क साधावे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav