नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचनांवर सुनावणी संपन्न
- by Santosh Jadhav
- Feb 17, 2022
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचनांवर सुनावणी संपन्न
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचना सुनावणी मा. राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राधिकृत अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त श्री. अविनाश सणस, कोकण विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी उपआयुक्त श्री. रविंद्र जाधव, जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी जिल्हा सह आयुक्त श्री. संतोष देहेरकर तसेच राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव श्री. अतुल जाधव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, निवडणुक विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, शहर अभियंता श्री. संजय देसाई हे अधिकारी उपस्थित होते.
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारूप प्रभाग रचनेवर ३८५२ हरकती / सूचना प्राप्त झालेल्या होत्या. त्यावर सकाळी ९ वाजल्यापासून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुरु झालेल्या सुनावणीमध्ये उपस्थित ११४४ निवेदन कर्त्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेण्यात आले. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav