Breaking News
नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या अकराव्या पर्वासाठी सोळा सौंदर्यवती सज्ज
स्वप्न सत्यात उतरविणारी सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईचे अकरावे पर्व
नवी मुंबई : सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी जी मानली जाते ती अर्थातच मिस नवी मुंबई आपल्या अकराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट ने अकरा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्य स्पर्धा आपल्या नवी मुंबई मध्ये आयोजित करावी. अकरा वर्षाच्या या प्रवासातील अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.
"आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सोळा सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिम च्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाते."
यू अँड आय एंटरटेनमेंटचे हरमीत सिंग यांनी सांगितले.
"तरुण मुलींमधील गुणविषेश ओळखून ते तेवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना रंगमंचावर आणण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेत आहोत. आणि या प्रतिभावान मुलींना योग्य असे व्यासपीठ देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ''
यू अँड आय एन्टरटेनमेंटचे डायरेक्टर मनमीत सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
"नवी मुंबईत सौंदर्यवती होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी अशी कोणतीही संधी उपलब्ध नसताना आम्ही त्यांना व्यासपीठ देण्यास सुरुवात केली. नवी मुंबई च रूपांतर एका ग्लॅमर शहरात करण्याच्या उद्देशाने आम्ही सौंदर्यववतींच्या कलागुणांना वर्षानुवर्षे अशी अप्रतिम संधी देऊ शकलो आणि देत राहू याचा आम्हाला आनंद आहे!" श्री सुरिंदर सिंग - यू अँड आय एंटरटेनमेंट चे अध्यक्ष यांनी नमूद केले.
व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक आणि मानसशास्त्रज्ञ इंदरप्रीत कौर या सांगतात कि "मी वैयक्तिकरित्या या सौंदर्यवतीं मध्ये वर्षानुवर्षे झालेले परिवर्तन पाहिले आहे आणि एकत्रितरित्या हि स्पर्धा आयोजित केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो"
"मिस नवी मुंबई आणि यू अँड आय सोबत आमचा बरेच वर्ष संबंध आहे. या स्पर्धेने शहराला जो नाव लौकिक मिळून दिला आहे, त्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध झालो आहोत आणि या प्रतिष्ठित स्पर्धेशी आम्ही संबंधित आहोत याचा आनंद वाटतो." असे फोर पॉईंट नवी मुंबई चे महाव्यवस्थापक, स्टीफन डिसूझा यांनी सांगितले.
"गेल्या अनेक वर्षांपासून मिस नवी मुंबई सोबत माझं एक नातं निर्माण झालं आहे. या स्पर्धेमध्ये मिळणार आनंद व नवनवीन गोष्टीचे ज्ञान हे प्रत्येक वेळी काही तरी नवीन शिकवून जाते. " असे रनवे डायरेक्टर आणि रॅम्प वॉक ट्रेनर स्मृती बथिजा हिने सांगितले . स्मृती ने मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९-२०२० 'किताब जिंकला आहे. मिस नवी मुंबई २०२२ ची पत्रकार परिषद फोर पॉइंट्स वाशी येथे आयोजित करण्यात आली होती.
अंतिम फेरीत दाखल झालेल्या सोळा सौंदर्यवतींनी उपस्थितांची मने जिंकलीत यावेळी फोर पॉईंट नवी मुंबई चे महाव्यवस्थापक, स्टीफन डिसूझा, एसके ग्रुपचे डॉ संजीव कुमार , शिकाराचे अशोक मेहरा , एइएचआयच्या डॉ वंदना जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.
अंतिम फेरी मध्ये दाखल झालेल्या सोळा सौंदर्यवतीं
१ नेहा अदनानी
२ सलोनी कश्यप
३ मुस्कान बत्रा
४ सानिका दिवेकर
५ कार्तिका शेट्टी
६ अमिषा ठाकूर
७ चैताली घरत
८ सुखमीत रंधवा
९ श्रुतिका राठोड
१० चाहत सिंग
११ यामिनी तिवारी
१२ श्रुती राऊळ
१३ पायल शिंगाडे
१४ खुशी अजवानी
१५ शताक्षी किरण
१६ रक्षा पंजाबी
याना रॅम्प वॉकचे प्रशिक्षण अभिनेत्री आणि मॉडेल सिमृती बथिजा- रनवे कोरिओग्राफी आणि पेजेंट ग्रूमिंग एक्सपर्ट- मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९ द्वारे केले जाईल.तसेच व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आणि मेंटल वेलनेस मेंटॉरिंग हे मानसशास्त्रज्ञ आणि व्यक्तिमत्व विकास मेंटॉर - इंदरप्रीत कौर गुप्ता यांच्याद्वारे दिले जातील. जेणे करून त्यांच्यातील व्यक्तीमत्वाला चालना मिळेल व अंतिम फेरीत स्वतःला त्या सिद्ध करतील.
या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार दिनाक २६ फेब्रुवारी २००२२ रोजी वाशीच्या फॉर फोईन्ट्स मध्ये संपन्न होईल.
रिपोर्टर