भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्वच भारतीय विद्यार्थ्याच्या तत्काळ सुटकेची व्यवस्था करावी : आप , नवी मुंबई
- by Santosh Jadhav
- Mar 03, 2022
भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्वच भारतीय विद्यार्थ्याच्या तत्काळ सुटकेची व्यवस्था करावी : आप , नवी मुंबई
नवी मुंबई : रशिया - युक्रेन युद्धाच्या बातम्या ताज्या असतानाच, तेथे अडकून पडलेल्या साधारण वीस हजार भारतीयांच्या भयावह स्थितीच्या व्हिडीओ सहित बातम्या देखील मीडियावर वायरल होत आहेत. ह्या मधील बहुसंख्य भारतीय हे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामधील तज्ञ व्यावसायिक देखील आहेत. सरकारकडून जरी चार केंद्रीय मंत्री, ह्या सुटकेच्या कामासाठी पाठवले असले तरी, एकंदरीत ह्या कामात फार प्रगती होताना दिसत नाही. तेथील भारतीय दूतावासात, कोणी फोन देखील उचलत नाही, कि मेसेजला रिप्लाय देत नाहीत अश्या तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. हे युध्द आणि त्यामुळे युक्रेन मधील भारतीय तरुणाईवर ओढवलेली परिस्तिथी पाहता, फक्त भाषणबाजी करणाऱ्या, केंद्रीय परराष्ट्र खात्याच्या कारभाराचे आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेचे पितळ उघडे पडत चालले आहे.
आम आदमी पार्टी , नवी मुंबई तर्फे ह्या युक्रेन मधील भारतीय तरुण-तरुणींची त्वरित, सुखरूप सुटकेची मागणी लावून धरत वाशी येथील शिवाजी चौक येथे बुधवार दोन मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ह्या प्रसंगी कार्यकर्त्याची उपस्थिती लक्षणीय होती. "परत आणा , परत आणा-आमच्या मुलांना परत आणा", "भाषण नको कृती हवी" अश्या घोषणा, "नो वॉर" असे लिहिलेले मास्क घालून देण्यात आल्या. ह्या प्रसंगी रशियन सैनिकांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या नवीन शेखरप्पा ज्ञानगौदर ह्या वैद्यकीय विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
ह्या भीषण युध्दामुळे साधारण २० हजार भारतीय युक्रेन मध्ये अडकले असताना, केंद्र सरकार त्याच्या सुटकेची ठोस उपाय योजना न करता, निवडणूक प्रचारात व्यस्थ आहे, हे खूपच दुःखदायक आहे - कान्तिलाल भंवरलालजी जैन - उपाध्यक्ष, आप नवी मुंबई
आज जवळ जवळ २० हजार वैद्यकीय छात्र, युक्रेन युद्ध मध्ये अडकलेले आहेत, आपल्या देशात ५५० च्या वर मेडिकल कॉलेजेस असून देखील, त्यांना युक्रेन मधील, चार पटीने स्वस्त आणि आपल्या पेक्षा उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षणासाठी का जावे लागते, ह्याचा विचार आपल्या शिक्षण खात्यांनी नक्की केला पाहिजे - सुधीरजी पांडे - उपाध्यक्ष - आप नवी मुंबई.
युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी, ठोस उपाययोजनांचा प्लॅन, सरकारने जाहीर करून त्यांच्या भारतातील नातेवाईकांना काही प्रमाणात का होईना दिलासा द्यावा - जयसिंगजी शेरे , अध्यक्ष - आप पनवेल
केंद्र सरकारने फक्त २०००० भारतीय नागरिकांना युक्रेन मधुन आणून पब्लिसिटी करणं थांबवावं ती नंतर ही करता येईल. एकूण २० हजार भारतीय तिथे अडकून आहेत.त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत - चिन्मय गोडे - युवा जिल्हाध्यक्ष-आप नवी मुंबई
भारत आणि युक्रेन मध्ये मैत्रीपूर्ण संबंध असताना, एवढ्या मोठ्या संख्येने युध्दात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेची मुत्सद्देगिरी, आपले परराष्ट्र खाते का करू शकत नाही ? निनाजी जोहरी - सहसचिव युवा विभाग आणी वॉर्ड अध्यक्ष - आप नवी मुंबई
युक्रेन युद्धात अडकलेल्या २०००० भारतीयांची, त्वरित सुटका जर आपले सरकार करू शकत नसेल, तर ते सव्वाशे कोटी च्या वर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचे संरक्षण करायला समर्थ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे - महादेवजी गायकवाड - वॉर्ड अध्यक्ष - पॅनल २६.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav