महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीमुळे कोपरखैरणे मधील अनधिकृत पणे चालू असलेले सिद्धीका हॉस्पिटल अखेरीस बंद
- by Santosh Jadhav
- Apr 03, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीमुळे कोपरखैरणे मधील अनधिकृत पणे चालू असलेले सिद्धीका हॉस्पिटल अखेरीस बंद
नवी मुंबई : कोपरखैरणे, सेक्टर १४ मधील पायल सोसायटी व सेक्टर १५ मधील प्रतीक्षा सोसायटी स्थित सिद्धीका हॉस्पिटल विरोधात स्थानिक नागरिकांचा संघर्ष गेले काही वर्षे चालू आहे. तरी त्यांना कोणत्या ही प्रकारे न्याय मिळाला नाही, सदर हॉस्पिटल विरोधात न्यायालयीन लढाई चालू असून बऱ्याच तक्रारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच अधिकारी यांना दिल्या गेल्या आहेत. परंतु हॉस्पिटल मार्फत कारवाई न करण्यासाठी आज पर्यंत अधिकाऱ्यांना पैसा पुरविला आहे की काय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असता , तात्काळ महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, यांच्याकडे तक्रार करताच सर्व जण खडबडून जागे झाले व हॉस्पिटल १० दिवसात बंद केले.
दोन वर्ष संघर्ष करून झाल्यावर स्थानिक लोकांनी मनसेकडे धाव घेताच मनसेने तात्काळ न्याय मिळवून दिल्याबद्दल लोकांकडून मनसेचे कौतुक करण्यात येत आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद जगन्नाथ घोरपडे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav