Breaking News
आप नवी मुंबई तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नवी मुंबई : आपल्या देशातील गरिबांच्या मुलांना , बाबासाहेबांच्या , संविधानाप्रमाणे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट शिक्षणाचा हक्क दिल्ली मध्ये प्रस्तापित करून दाखवणारी आम आदमी पार्टी हि तरुण , तडफदार , सुशिक्षित , सुसंस्कृत , कट्टर देशप्रेमी , कट्टर इमानदार , धर्मनिरपेक्ष आणि बाबासाहेबानी आपल्या देशासाठी लिहिलेल्या संविधानावरच विश्वास ठेवणाऱ्या , संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या सामान्य नागरिकांचे एक संघटन आहे.
गुरुवार तारीख १४ एप्रिल रोजी , आप नवी मुंबई तर्फे, दर वर्षी प्रमाणे संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती , बाबा तेरा सपना अधुरा -केजरीवाल करेगा पुरा अश्या घोषणा देत , नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
कोपरखैरणे येथे सुमित कोटियन ( वॉर्ड ३८ अध्यक्ष आणि युवा नेते ), अभिषेक पांडे ( वॉर्ड ३७ अध्यक्ष युवा नेते) आणि श्रीमती नीना जोहरी ( वॉर्ड ४२ अध्यक्ष आणि महिला नेत्या ) ह्यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे जनसंपर्क कार्यालय येथे अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी आप पंजाब विधानसभेच्या शानदार विजयानंतर मोठ्या संख्येने आप - नवी मुंबईत सामील झालेल्या नवीन कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश देखील करण्यात आला. ह्यात ऐरोली येथून , सेवानिवृत्त लेबर कमिशनर देवराम सूर्यवंशी साहेब , साबळे साहेब आणि दिघा येथील शिवसेना नेते सुनील पाटोळे, घणसोली येथून अनिल जाधव, नेरुळ येथून दीपक भोसले आणि इतर नागरिकांचा समावेश होता.
ह्या नंतर तुर्भे नाका येथे सुनील जाधव ( वॉर्ड ७१ अध्यक्ष आणि युवा नेते) आणि राहुल मेहरोलिया (वॉर्ड अध्यक्ष ) ह्यांच्या नेतृत्वा खाली रॅली आयोजित करण्यात आली.
त्या नंतर आप नवी मुंबईच्या टीमने , उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर मॅडम , डॉ. मिलिंद तांबे ( वॉर्ड ७१ अध्यक्ष आणि युवा नेते) आणि श्रीमती मानसी पवार - ऐरोली विभाग अध्यक्ष ह्यांच्या नेतृत्वा खाली ऐरोली येथील बाबासाहेब स्मारकास सदिच्छा भेट दिली.
रिपोर्टर